वयोवृद्धाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:05 IST2021-09-13T04:05:58+5:302021-09-13T04:05:58+5:30

मुंबई : बांधकामाधीन इमारतीमध्ये व्यवसायासाठी जागा आणि त्यानंतर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून वडाळ्यातील वयोवृद्धाची फसवणूक करण्यात आल्याची घटना काळाचौकीमध्ये ...

The deception of the elderly | वयोवृद्धाची फसवणूक

वयोवृद्धाची फसवणूक

मुंबई : बांधकामाधीन इमारतीमध्ये व्यवसायासाठी जागा आणि त्यानंतर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून वडाळ्यातील वयोवृद्धाची फसवणूक करण्यात आल्याची घटना काळाचौकीमध्ये घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहेत.

.....

बँक खात्यातील रकमेवर ऑनलाइन डल्ला

मुंबई : फोन पे अँपच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करत रिवाॅर्डचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ठगांनी कुलाब्यातील तरुणाच्या बँक खात्यातील ९० हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहेत.

....

फोन सेवा बंद झाल्याचा संदेश पाठवून गंडा

मुंबई : फोन सेवा बंद झाल्याचा संदेश पाठवून ठगाने दोघींची फसवणूक केल्याची घटना वडाळ्यात घडली आहे. याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करून वडाळा टी टी पोलीस तपास करत आहेत.

....

Web Title: The deception of the elderly