डेब्रिज माफिया पुन्हा सुसाट

By Admin | Updated: June 9, 2014 02:07 IST2014-06-09T02:07:37+5:302014-06-09T02:07:37+5:30

शहरात धुमाकूळ घालणाऱ्या डेब्रिज माफियांना आवर घालणे प्रशासनाला जिकिरीचे होऊन बसले आहे.

Deborah Mafia reassured | डेब्रिज माफिया पुन्हा सुसाट

डेब्रिज माफिया पुन्हा सुसाट

नवी मुंबई : शहरात धुमाकूळ घालणाऱ्या डेब्रिज माफियांना आवर घालणे प्रशासनाला जिकिरीचे होऊन बसले आहे. डेब्रिज टाकणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेली विशेष पथकेसुध्दा कुचकामी ठरू लागली आहेत. या पथकांची नजर चुकवून विनापरवाना डेब्रिज टाकण्याचे सत्र सुरूच असून या डेब्रिज माफियांनी आता आपले लक्ष खाडीकिनारे व मोकळ्या भूखंडांवर केंद्रित केल्याचे दिसून आले आहे.
कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी काही चाणाक्ष माफियांनी आता आपले लक्ष शहरातील प्रमुख रस्ते व खाडी किनाऱ्यावर केंद्रित केले आहे. वाशीच्या मिनी सिशोअर जवळील जुहू गावाच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यालगतच्या खाडी किनाऱ्यावर ठिकठिकाणी डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्याचे दिसून येते. कोपरखैरणे सेक्टर २० मधून खाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा डेब्रिज पडल्याचे पाहावयास मिळते. तसेच घणसोलीच्या नवीन पामबिच मार्गावर खारफुटीच्या आडून दिवसाआड डेब्रिजच्या शेकडो गाड्या रिकाम्या केल्या जातात. तसेच घणसोलीच्या विविध भागात असलेले मोकळे उद्यान सुध्दा या माफियांना सोयीचे ठरले आहेत. पामबिच मार्ग, सायन-पनवेल महामार्गावरसुध्दा ठिकठिकाणी डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्याचे पाहावयास मिळते. (प्रतिनिधी)

Web Title: Deborah Mafia reassured