कांदिवलीत डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: September 17, 2014 01:30 IST2014-09-17T01:30:58+5:302014-09-17T01:30:58+5:30

कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात मालवणी परिसरात राहणा:या एक 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सूरजित देवनाथ असे मृत तरुणाचे नाव आहे.

Death of a youth due to dandelion in Kandivli | कांदिवलीत डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

कांदिवलीत डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

मुंबई : कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात  मालवणी परिसरात राहणा:या एक 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सूरजित देवनाथ असे मृत तरुणाचे नाव आहे. 
 सूरजित मालवणी येथील आजमी नगर परिसरात राहत होता. तो  सहा महिन्यांपूर्वीच आपल्या भावाकडे कोलकाता येथून कामासाठी मुंबईत आला होता. तीन दिवसांपूर्वी त्याला ताप आला. त्यावेळी घराजवळच्या डॉक्टरांकडे त्याला नेण्यात आले होते. मात्र ताप कमी न झाल्यामुळे त्याला उपचारांसाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याला औषध देऊन घरी पाठवले होते. मात्र रात्री अचानक त्याची तब्येत खालावली असता, त्याला पुन्हा  रुग्णालयात दाखल केले. तेव्हा वैद्यकीय अहवालात त्याला डेंग्य़ू झाल्य़ाचे सिद्ध झाल़े त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

 

Web Title: Death of a youth due to dandelion in Kandivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.