टेम्पोच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 06:01 IST2018-12-06T06:01:30+5:302018-12-06T06:01:31+5:30

टेम्पोच्या धडकेत ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी हा प्रकार मालाड परिसरात घडला.

Death of a young man in tempo | टेम्पोच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

मुंबई : टेम्पोच्या धडकेत ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी हा प्रकार मालाड परिसरात घडला. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली असून, महिलेच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे.
लक्ष्मी गुप्ता असे या मृत वृद्धेचे नाव आहे. त्या मालाड पाश्चिमच्या मालवणी परिसरात गेट क्रमांक ५ मध्ये राहत होत्या. बुधवारी सकाळी मालाडच्या सबवेमधून त्या रस्ता ओलांडत होत्या. त्या वेळी समोरून एक टेम्पो भरधाव वेगाने आला. गाडीला पाहून गुप्ता गोंधळल्या आणि रस्त्यावरच पडल्या. त्याच क्षणी टेम्पो त्यांच्या अंगावरून गेला. यातगंभीर जखमी झालेल्या गुप्ता यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवित, टेम्पो चालक दिनेश यादव (३५) याला अटक केली आहे. गुप्ता यांच्याकडे स्थानिक बँकेचे पासबुक सापडले. त्यावर असलेल्या फोटोमुळे गुप्ता यांचे नाव पोलिसांना समजले. त्यांच्या कुटुंबीयांचा शोध पोलीस घेत आहेत. बँकेच्या पासबुकवरील पत्ता अर्धवट असल्याने, त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Death of a young man in tempo