रे रोड येथील अपघातात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 02:53 IST2018-07-18T02:53:21+5:302018-07-18T02:53:24+5:30

रे रोड येथे भरधाव डंपरच्या धडकेत पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली.

Death of a woman in a road accident in Ray Road | रे रोड येथील अपघातात महिलेचा मृत्यू

रे रोड येथील अपघातात महिलेचा मृत्यू

मुंबई : रे रोड येथे भरधाव डंपरच्या धडकेत पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून शिवडी पोलिसांनी आरोपी चालक अन्नारुऊल्लाह खान (४७) याला बेड्या ठोकल्या आहेत.
दानाबंदर परिसरात शिवा गौडा (४०) हे सोमवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास दुचाकीवरून पत्नी, मेहुणी आणि मेहुणीच्या मुलीसह रे रोड परिसरातून जात होते. त्याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या डंपरने गौडा यांच्या दुचाकीला धडक दिली. यात गौडा यांची पत्नी हनुमंत अन्न (३८), मेहुणी माली, तिची मुलगी रामेश्वरी गंभीर जखमी झाल्या. पैकी हनुमंत अन्न यांना मृत घोषित केले, तर अन्य दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Death of a woman in a road accident in Ray Road