बोरीवली स्टेशनजवळ लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: October 1, 2014 02:57 IST2014-10-01T02:57:01+5:302014-10-01T02:57:01+5:30
रेल्वेरूळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून एका महिलेचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. मनीषा पांडे असे मृत महिलेचे नाव असून, ती कांदिवली परिसरात राहते.

बोरीवली स्टेशनजवळ लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू
>मुंबई : रेल्वेरूळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून एका महिलेचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. मनीषा पांडे असे मृत महिलेचे नाव असून, ती कांदिवली परिसरात राहते. या प्रकरणी आता बोरीवली रेल्वे लोहमार्ग पोलीस तपास करीत आहेत.
मनीषा ही कांदिवलीत पतीसोबत राहत होती. ती काही दिवसांपासून निराश होती. त्यामुळे हा अपघात आहे की आत्महत्या, याचा तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)