मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: June 19, 2015 01:47 IST2015-06-19T01:47:03+5:302015-06-19T01:47:03+5:30

गेल्या महिन्यांत मारहाणीत जखमी झालेल्या एका इसमाचा बुधवारी सायंकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही व्यक्ती एका

The death of the victim, who died in the murder | मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू

मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू

मुंबई : गेल्या महिन्यांत मारहाणीत जखमी झालेल्या एका इसमाचा बुधवारी सायंकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही व्यक्ती एका टीव्ही अभिनेत्रीचा भाऊ असल्याचे समजते. या प्रकरणी अंधेरी पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अनोळखी व्यक्तीवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
कमल ताराचंद भवन (५२) असे या इसमाचे नाव आहे. जोगेश्वरी पूर्वच्या सदभक्ती मार्गावर ३१ मे, २०१५ रोजी तो बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याच्या डोक्याला आणि हातापायाला जखमा होत्या. त्याला कूपर रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. ‘आम्हाला या मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले, ज्यात भवन चालत असताना त्याला एका अ‍ॅक्टिवावाल्याची धडक लागल्याने दोघांत शिवीगाळ होऊन नंतर झटापट झाल्याचे दिसल्याची माहिती अंधेरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किशोर शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the victim, who died in the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.