Join us

चिमुकलीच्या हत्येप्रकरणी तृतीयपंथीला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 06:39 IST

पळवून नेऊन अत्याचार; पोक्सो न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण करणे आणि त्यानंतर तिची क्रूरपणे हत्या करणाऱ्या तृतीयपंथीला विशेष  पोक्सो न्यायालयाने मंगळवारी फाशी ठोठावली. पोक्सोच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावण्याची पहिलीच वेळ आहे.

जुलै २०२१ मध्ये कफ परेड परिसरातील खाडीमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पुरलेला आढळला होता. याचदरम्यान तीन महिन्यांची  चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली होती. मुलीच्या पालकांशी वाद झालेल्या कन्हैया चौगुले (२८)  व त्याचा मित्र सोनू काळे (२०) या दोघा तृतीयपंथींना पोलिसांनी तपासानंतर ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यांनी चिमुकलीचे अपहरण करून हत्या केल्याची व त्यानंतर तिचा मृतदेह खाडीत पुरल्याचे कबूल केले. 

पैसे, नारळ, साडी नाही दिली म्हणून रागnकन्हैया आणि सोनू हे लोकवस्तीत फिरत असताना मुलीच्या घरी गेले. तिथे त्यांनी नवजात मुलीला आशीर्वाद दिला. त्याबदल्यात त्यांनी मुलीच्या पालकांकडून पैसे, नारळ आणि साडी मागितली. मात्र, आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांनी मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. nत्यानंतर रागात दोघेही निघून गेले.  मध्यरात्रीच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा आहे, असे बघून त्यांनी मुलीचे अपहरण केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिची हत्या करून मृतदेह खाडीत पुरला होता.

टॅग्स :न्यायालय