नराधम वसंताची फाशी सुप्रीम कोर्टाकडून कायम
By Admin | Updated: November 27, 2014 01:50 IST2014-11-27T01:50:30+5:302014-11-27T01:50:30+5:30
बलात्कार करून तिचा अमानुषपणो खून करणा:या वसंता संपत दुपारे या नराधमाची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही बुधवारी कायम केली.

नराधम वसंताची फाशी सुप्रीम कोर्टाकडून कायम
मुंबई : सहा वर्षापूर्वी नागपूर शहराच्या त्रिलोक नगर भागातून चार वर्षाच्या एका मुलीचे अपहरण केल्यानंतर बलात्कार करून तिचा अमानुषपणो खून करणा:या वसंता संपत दुपारे या नराधमाची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही बुधवारी कायम केली.
केलेल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप झाल्याचे आरोपी वसंताच्या वर्तनावरून दिसत नाही. तो सुधारण्याचीही शक्यता नाही. त्याने ज्या राक्षसी पद्धतीने या निरागस मुलीला आपल्या वासनेची शिकार बनविले ते पाहता असा आरोपी जिवंत राहणो हा समाजासाठी कायमचा धोका आहे, असे न्या. दिपक मिश्र, न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठाने वसंताचे अपील फेटाळताना अधोरेखित केले.
ुवाडी पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या खटल्यात नागपूर सत्र न्यायालयाने वसंता दुपारेला 23 फेब्रुवारी 2क्12 रोजी फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यावर उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेऊन न्या. पी. व्ही हरदास व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने वसंताच्या फाशीवर महिनाभरात शिक्कामोर्तब केले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही फाशी कायम केल्याने या खटल्याचे सर्व स्तरांवरील निवाडे अवघ्या अडीच वर्षात पूर्ण झाले आहेत.
त्रिलोक नगर येथील कुशाल बनसोडे यांच्या चाळीत राहणा:या सुभाष सोनावणो यांचा वसंता दुपारे मित्र होता व तो तेथे नेहमी येत असे. 3 एप्रिल 2क्क्8 रोजी वसंता सुबाष सोनावणो यांच्या घरी टेप रेकॉर्डर दुरुस्त करण्यासाठी आला. तो सायकलवरून पर जायला निघाला तेव्हा घरांसमोरच्या मोकळ्य़ा जागेत लहान मुले खेळत होती. त्यापैकी सानोवणो यांच्या शेजारी राहणा:या चार वर्षाच्या मुलीला, चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून, वसंता सायकलवरून घेऊन गेला. नंतर त्याने संतोषीमाता नगरात खडगाव रोडवरील गल्लीत गती ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूस नेऊन या चिमुरडीवर बलात्कार केला. नंतर त्याने अनुक्रमे आठ व साडेसात किलो वजनाचे दोन दगड तिच्या डोक्यात घालून तिचा अमानुष खून केला. विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या वसंताने माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य केले तेव्हा तो 47 वर्षाचा होता.
अशा नराधमास कोणतीही दया दाखविण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आरोपीने हा गुन्हा ज्या निर्दयतेने केला ते पाहता हे प्रकरण नक्कीच ‘विरळात विरळा’ या वर्गात मोडणारे आहे व त्यासाठी फक्त फाशी हिच शिक्षा योग्य आहे. 47 वर्षाच्या एका विवाहित पुरुषाने चार वर्षाच्या निरागस मुलीला आपल्या राक्षसी वासनेची शिकार बनवावे व त्यानंतर तिचा खून करावा, ही समाजाच्या पचनी न पडणारी अमानुषता आहे. (विशेष प्रतिनिधी)
ही तर पराकोटीची विकृती
न्यायालय म्हणते की, ओळखीतल्याच व्यक्तीकडून एका असहाय व निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला जाणो हे केवळ व्यक्तिगत विश्वासाला तडा देणारेच नव्हे तर विश्वासावर आधारलेली समाजव्यवस्था उद्ध्वस्त करणारे आहे. ही पराकोटीची विकृती असून ती सामाजिक संतुलनास मारक आहे. अशा घातक विकृतीचे तेवढय़ाच तीव्र तिरस्कृत भावनेने मुकाबला व्हायला हवा.