प्रचारासाठी जाणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू

By Admin | Updated: June 9, 2015 22:28 IST2015-06-09T22:28:00+5:302015-06-09T22:28:00+5:30

प्रचाररॅलीत सहभागी होण्यासाठी जात असताना दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात भाजपा उमेदवार मीना कुवरा यांच्या मुलासह अन्य एकजण ठार झाला.

Death in road accidents | प्रचारासाठी जाणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू

प्रचारासाठी जाणाऱ्या दोघांचा अपघातात मृत्यू

वसई : प्रचाररॅलीत सहभागी होण्यासाठी जात असताना दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात भाजपा उमेदवार मीना कुवरा यांच्या मुलासह अन्य एकजण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना वसई येथे सोमवारी घडली.
वसई पूर्वेस सातिवली फाटा येथे हर्षद कुवरा त्याचा मित्र अक्षय मराठे तसेच अमोल महाजन हे प्रचाररॅलीत सहभागी होण्याकरिता मोटारसायकलने निघाले दरम्यान टेम्पोने धडक दिली. यात हर्षद कुवरा, अक्षय मराठे ठार तर अमोल गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Death in road accidents