हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस शिपायाचा मृत्यू
By Admin | Updated: June 16, 2017 16:15 IST2017-06-16T16:15:53+5:302017-06-16T16:15:53+5:30
चेंबूरच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शैलेश बोरीचा (४४) या पोलीस शिपायाचा शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस शिपायाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - चेंबूरच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शैलेश बोरीचा (४४) या पोलीस शिपायाचा आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बोरीचा हे टिळक नगर पोलीस ठाण्यातील मोबाईल व्हॅन वर चालक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी नेहमी प्रमाणे ते ड्युटीवर आले होते. मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ त्यांना राजावाडी रुग्णलायत दाखल करण्यात आले . मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.