तेल माफीयांवर जीवे मारण्याचा गुन्हा

By Admin | Updated: September 26, 2014 01:16 IST2014-09-26T01:16:22+5:302014-09-26T01:16:22+5:30

मनोर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनूसार अज्ञात पाच, सहा इसम इनोव्हा गाडीमध्ये अवैध तेल वाहतुक करणार आहे

The death penalty is against oil mafia | तेल माफीयांवर जीवे मारण्याचा गुन्हा

तेल माफीयांवर जीवे मारण्याचा गुन्हा

मनोर : येथील पोलीसांनी तेल माफीयांची इनोव्हा गाडी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीसांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न करून पळून गेले. मात्र सफाळे येथे सापळा रचून पोलीसांनी गाडीसह दोन आरोपी अटक केले आहेत. मनोर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केले आहेत.
मनोर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनूसार अज्ञात पाच, सहा इसम इनोव्हा गाडीमध्ये अवैध तेल वाहतुक करणार आहे अशी खबर मनोर पोलीसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने मारोती पाटील सहा. पो. नि, गायकवाड, उत्कारी, गोसाली, चनै यानी पालघर मनोर रस्त्यावर मनोर बाजारपेठेत इनोव्हा अडवीण्याचा प्रयत्न केला असता चालकांनी भरधाव वेगात पोलीसांच्या अंगावर गाडी घालुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गाडी घेऊन पळून गेले. त्यांचा पाठलागही केला असता सापडले नाही त्यानंतर मनोर पोलिसांनी वायरलेस केला. प्रत्येक पोलीस ठाण्यात नाकाबंदी करण्यास सांगितली असता सफाळे येथे पोलीसांनी नाकाबंदीमध्ये त्यांना अडविले असता तसेच कृत्य सफाळे येथेही केले.
पोलीसांनी हवाई फायरींग करून त्यांना पकडले. मनोर बाजार पेठेत २३ सप्टें. रात्री २.४० मिनीटांनी घटना घडली होती. सफाळे पोलीसांनी त्यांना पहाटे ४ च्या सुमारास पकडले.

Web Title: The death penalty is against oil mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.