इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू
By Admin | Updated: September 16, 2015 00:28 IST2015-09-16T00:28:18+5:302015-09-16T00:28:18+5:30
पक्ष्यांना दाणे टाकण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेला तरुण गच्चीवरून खाली पडून मरण पावला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी

इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू
मुंबई : पक्ष्यांना दाणे टाकण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेला तरुण गच्चीवरून खाली पडून मरण पावला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.
जतीन जैन असे या व्यक्तीचे नाव असून, तो कांदिवली पूर्व येथील अशोकनगर भागातील पावापुरी इमारतीत राहत होता. सोमवारी सकाळी तो पक्ष्यांना दाणे टाकण्यासाठी गच्चीवर गेला. त्या वेळी गच्चीवर आलेल्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाने त्याला हटकले. आपण पक्ष्यांना दाणे टाकण्यासाठी आल्याचे सांगून जैन याने सुरक्षारक्षकाला खाली पाठविले. थोड्या वेळाने जैनचा मृतदेह इमारतीच्या आवारात सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी सांगितले. जैनने आत्महत्या केली की हा अपघात आहे, याची पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)