Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! गरबा खेळताना डोंबिवलीकर तरुणाचा मृत्यू, कारणही कळलं...

By मनीषा म्हात्रे | Updated: October 2, 2022 18:44 IST

मुलुंडमध्ये प्रेरणा रासमध्ये गरबा खेळताना २७ वर्षीय डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुंबई :

मुलुंडमध्ये प्रेरणा रासमध्ये गरबा खेळताना २७ वर्षीय डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत ह्दय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले.डोंबिवलीतील जुनी डॉन बॉस्को शाळेमागील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये आई वडिलांसोबत राहणाऱ्या वृक्षभ मांगे (२७) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मोठ्या बहिणीचा विवाह झाला आहे. एमबीए झालेला वृक्षभ नुकताच बोरिवलीतील एका खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. घरातील एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. शनिवारी वृक्षभ कुटुंबियांसोबत मुलुंडच्या भाजप खासदार मनोज कोटक यांच्या मुलुंडच्या कालीदास नाट्यगृह येथे आयोजिलेल्या प्रेरणा रास येथे गरब्याचा आनंद घेण्यासाठी आला होता. गरबा खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी ऍसिडिटी झाल्याचे समजून थंड पेय पिण्यास दिले. त्यानंतर जास्त त्रास जाणवल्याने तेथील मुलांच्या मदतीने तात्काळ रुग्णवाहिकेतून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केल्याने कुटुंबियांना धक्का बसला.ह्दय विकारामुळे मृत्यूहृदय विकारामुळे त्याचा मृत्यू झाला असून कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन डोंबिवलीला गेले असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  कांतीलाल कोथिंबिरे यांनी दिली.

टॅग्स :नवरात्रीमुंबई