मुंबई : जोगेश्वरी येथील बेहराम बागेतील हनुमान चाळीत झालेल्या सिलिंडर स्फोटातील जखमींपैकी शंकुतला कागल (४६) या महिलेचा रविवारी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला आहे, अशी माहिती कस्तुरबा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. २१ मे रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास झालेल्या सिलिंडर स्फोटात पंधरा जण जखमी झाले होते. जखमींपैकी पाच जखमी ट्रॉमा केअर महापालिका रुग्णालय, दोन जखमी सायन रुग्णालय आणि दोन जखमींना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या जखमींची प्रकृती स्थिर असून, पंधरापैकी पाच जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका जखमीचा रविवारी मृत्यू झाला.
सिलिंडर स्फोटातील एका जखमी महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 02:23 IST