मुंबईच्या फॅशन डिझायनरचा मृत्यू

By Admin | Updated: December 31, 2014 01:28 IST2014-12-31T01:28:32+5:302014-12-31T01:28:32+5:30

नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट पार्टी करण्याचे अनेकांचे नियोजन सुरू असतानाच गोव्यात सोमवारी रात्री सुपरसॉनिक डान्स म्युझिक पार्टीत मुंबईतील फॅशन डिझायनरचा संशयास्पद मृत्यू झाला.

Death of fashion designer of Mumbai | मुंबईच्या फॅशन डिझायनरचा मृत्यू

मुंबईच्या फॅशन डिझायनरचा मृत्यू

पणजी : नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट पार्टी करण्याचे अनेकांचे नियोजन सुरू असतानाच गोव्यात सोमवारी रात्री सुपरसॉनिक डान्स म्युझिक पार्टीत मुंबईतील फॅशन डिझायनरचा संशयास्पद मृत्यू झाला. अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे तिचा बळी गेल्याचा पोलिसांना संशय आहे. इशा मंत्री (२९) असे तिचे नाव आहे़
कांदोळीतील सुपरसॉनिक इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक पार्टीदरम्यान सोमवारी रात्री १२.३० वाजता मुंबईतील फॅशन डिझायनर इशा मंत्री (२९) हिला अचानक उलट्या होऊ लागल्यानंतर त्यानंतर ती बेशुद्ध पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. शवविच्छेदनानंतरच तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. इशा तिच्या १२ मित्रांबरोबर येथे पार्टीसाठी आली होती. कळंगुट पोलिसांनी १२ जणांचे जबाब नोंदविले आहेत. इशाची बहीण दुबईहून आल्यानंतर गुरुवारी तिचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
ड्रग्स अन् बिच पार्ट्या
बिचवर होणाऱ्या पार्ट्यांत अमली पदार्थांचे सेवन सर्रासपणे होत असल्याचे अनेक घटनांमुळे स्पष्ट झाले आहे. २००९ साली कांदोळी येथे झालेल्या बीच पार्टीत मेहा बहुगुणा या बंगळुरू येथील युवतीचा मृत्यू झाला.

Web Title: Death of fashion designer of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.