‘लाइन क्रॉस’चा ‘डेथ ट्रॅप’

By Admin | Updated: December 29, 2014 02:54 IST2014-12-29T02:54:15+5:302014-12-29T02:54:15+5:30

महानगरी मुंबईमध्ये रेल्वे विभागाकडून रुळ ओलांडण्यांविरुद्ध जनजागृतीसोबतच वारंवार कारवाई मोहीम राबविण्यात येते.

'Death Cross''s 'Death Trap' | ‘लाइन क्रॉस’चा ‘डेथ ट्रॅप’

‘लाइन क्रॉस’चा ‘डेथ ट्रॅप’

मुंबई : महानगरी मुंबईमध्ये रेल्वे विभागाकडून रुळ ओलांडण्यांविरुद्ध जनजागृतीसोबतच वारंवार कारवाई मोहीम राबविण्यात येते. परंतु काही मिनिटे वाचविण्याच्या नादात नागरिक मृत्यूच्या सापळ््यात अडकत असल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षात सप्टेंबर महिन्यापर्यंत रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करताना लोकल अथवा एक्स्प्रेस ट्रेनखाली येऊन १ हजार ४५५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आली आहे.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात लोहमार्ग पोलिसांकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २००९ ते ३० जून २०१४ पर्यंत लोकलखाली येऊन किती नागरिकांचा जीव गेला तसेच रेल्वे अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात एकूण किती मृत्यू झाले याबद्दल माहिती मागितली होती. लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार चालू वर्षात रुळ ओलांडताना १४५५ नागरिकांचा बळी गेला. सर्वाधिक १९९ बळी हे कल्याण स्थानकाजवळ गेले आहेत. प्रवासादरम्यान लोकलमधून पडून ६१२ नागरिकांचा मृत्यू झाला तर १४ जणांना लोकल टपावरून प्रवास केल्याने ‘शॉक’ लागून मृत्यू झाला. २०१४ सालात वर्षभरात २ हजार ६०८ नागरिकांचे रेल्वे क्षेत्रांत निरनिराळ््या कारणांमुळे मृत्यू झाले. यात मध्य रेल्वेअंतर्गत १ हजार ६९४ तर पश्चिम रेल्वेअंतर्गत ९१४ मृत्यूंची नोंद झाली.
साडेचार वर्षांत तेरा हजार मृत्यू
२००९ सालापासून ते जून २०१४ या साडेचार वर्षांत मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत मध्य क्षेत्रात १३ हजार ८७९ मृत्यू झाले. २००९ साली २ हजार २३८, २०१० मध्ये २ हजार ३२१, २०११ मध्ये २ हजार १४५, २०१२ मध्ये २ हजार २९७ तर २०१३ मध्ये २ हजार २७० नागरिकांना विविध अपघातांमध्ये जीव गमवावा लागला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Death Cross''s 'Death Trap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.