The death of the child due to breaking the kite on the roof | पतंग पकडताना छपरावरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू
पतंग पकडताना छपरावरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू

मुंबई : मकरसंक्रांतीला पतंग पकडण्याच्या प्रयत्नात कांदिवलीतील अभय राजभर उर्फ गोलू (१५) हा छपरावरून तोल जाऊन खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राजभर कुटुंबीयामध्ये शोककळा पसरली आहे.


अभय हा कांदिवली पूर्वच्या हनुमाननगरमध्ये असलेल्या कसारी सोसायटीत आईवडिलांसोबत राहत होता. १५ जानेवारीला मकरसंक्रांती दिनी तो पतंग उडविण्यासाठी घराच्या छतावर चढला होता. तेवढ्यात कापलेली एक पतंग खाली येताना त्याला दिसली. पतंग पकडण्यासाठी तो दुसऱ्या छतावर जाण्याचा प्रयत्न करू लागला; मात्र सिमेंटचा पत्रा तुटून तो घरात कोसळला. त्या वेळी त्याची आई घरात भांडी घासत होती.

नेमका तिच्यासमोरच तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. तिने आरडाओरडा करीत शेजाºयांना बोलावले. त्यांच्या मदतीने त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Web Title: The death of the child due to breaking the kite on the roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.