Join us

आणखी एका खातेदाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:07 IST

पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा रविवारी हृदयविकाराने मृत्यू झाला.

मुंबई : पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा रविवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. भारती सदारंगानी असे हृदयविकाराने मृत्यू झालेल्या महिला खातेदाराचे नाव आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांचे अडीच कोटी पीएमसी बँकेत अडकले आहेत. मुंबईतला हा पाचवा बळी आहे. भारती या कुटुंबीयांच्या भविष्याच्या चिंतेने नैराश्येत होत्या.

दरम्यान, त्यांचा मृत्यू हृदयविकाराने नाही, तर पीएमसी बँक घोटाळ्यामुळे आलेल्या तणावातून झाल्याचा आरोप त्यांचे जावई चंदन छोत्रांनी यांनी केला. यापूर्वी मुलुंड कॉलनीतील मुरलीधर धर्या, भट्टोमल पंजाबी यांच्यासह ओशिवरातील संजय गुलाटी या खातेदारांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता, तर खातेदार डॉक्टर निवेदिता बिजलानी यांनी आत्महत्या करत स्वत:चे आयुष्य संपविले होते.

टॅग्स :पीएमसी बँकहृदयविकाराचा झटका