अनिकेतच्या मृत्यूने कॅम्पस हळहळले

By Admin | Updated: September 7, 2014 01:09 IST2014-09-07T01:09:02+5:302014-09-07T01:09:02+5:30

आयआयटी मुंबईचा विद्यार्थी असलेल्या अनिकेत आंभोरे याचा आकस्मित मृत्यू त्याच्या मित्रंच्या जीवाला चटका लावून गेला आहे.

The death of Aniket's campus was strained | अनिकेतच्या मृत्यूने कॅम्पस हळहळले

अनिकेतच्या मृत्यूने कॅम्पस हळहळले

मुंबई : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी असलेल्या अनिकेत आंभोरे याचा आकस्मित मृत्यू त्याच्या मित्रंच्या जीवाला चटका लावून गेला आहे. अनिकेत गिटार उत्तम वाजवायचा आणि खूप चांगले बोलायचा अशा अनेक आठवणींना आयआयटीतील विद्याथ्र्यानी उजाळा दिला आहे.
आयआयटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकणा:या अनिकेत आंभोरे याचा गुरुवारी आयआयटी कॅम्पसमधील हॉस्टेल 13 च्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिकेतच्या मृत्यूने आयआयटीतील त्याच्या मित्रंना धक्का बसला आहे. 
गेल्या काही महिन्यांपासून त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. काही वेळा तो बोलता बोलता मध्येच वेगळ्या विषयावर चर्चा करायला लागे. अभ्यासातही त्याची कामगिरी उत्तम नव्हती. त्यामुळे त्याला शिक्षण पूर्ण करण्यास आणखी काही वर्षे लागणार होती.
तो गिटार उत्तम वाजवायचा. एका बँडमध्येही होता. तो त्यांच्यासोबतच अधिक असायचा. कधी भेटल्यास खूप चांगले बोलायचा. तो तणावात असल्याचे कधी पाहिले नसल्याचे एका विद्याथ्र्याने सांगितले. 
त्याचे वडील 1क्-15 दिवसांपूर्वी आयआयटीत आले होते. ते आम्ही पाहिले. त्याचे पालक आयआयटीत आल्याचे आम्ही पहिल्यांदाच पाहिले. त्याच्या पालकांनी त्याच्या मित्रंना त्याच्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. तो तणावात असल्याचे लक्षात येताच आम्हाला कळवा, असे अनिकेतच्या पालकांनी त्याच्या मित्रला सांगितले होते.
अनिकेत होस्टेल 1 मध्ये वास्तव्यास होता. मात्र, होस्टेल 13
मध्ये त्याचे अधिक मित्र राहत असल्याने तो तिथेच अधिक असायचा. होस्टेल 1 हे आयआयटीमध्ये पीएचडी करणा:या विद्याथ्र्यासाठी आहे. परंतु तिथे अनिकेतला कशी काय खोली 
देण्यात आली, हे आम्हालाही कळाले नाही, असे येथील विद्याथ्र्यानी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
होस्टेल 13 मध्ये रात्री तो वडिलांशी बोलत होता, हे काही मित्रंनी पाहिल्याचे एका विद्याथ्र्याने सांगितले. दरम्यान, नवी मुंबईतील ऐरोली येथे आंभोरे कुटुंबीय राहत असून या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अनिकेत मृत्यूपूर्वी वडिलांशी फोनवर बोलत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याबाबत त्याच्या मित्रंची चौकशी सुरू असल्याचे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय.एल. जाधव यांनी सांगितले.  (प्रतिनिधी) 
 
सोशल मीडियावरही हळहळ..
आयआयटीचा विद्यार्थी असणा:या अनिकेतच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. त्याच्या संगीत क्षेत्रतील कारकिर्दीवर प्रेम करणा:या मित्र परिवाराकडून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे. शिवाय, अनिकेतचा दमदार परफॉर्मन्स असणारा फेस्टिव्हलचा व्हिडीओ शेअर करून त्याच्या मित्र परिवाराने आठवणींना उजाळाही दिला आहे.
 
रॉकस्टार अनिकेत!
कॉलेजिअन्समध्ये प्रसिद्ध असणा:या आयआयटी बॉम्बेच्या ‘मूड इंडिगो’ फेस्टिव्हलच्या अॅँथमला अनिकेतने संगीत दिले होते. शिवाय, या व्हिडीओमध्ये अनिकेतने सादरीकरणही केले होते. या व्हिडीओच्या माध्यमातून ‘मूड इंडिगो फेस्टिव्हल’ जगभरात पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे.

 

Web Title: The death of Aniket's campus was strained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.