वर्सोवा पोलीस ठाण्यात आरोपीचा मृत्यू
By Admin | Updated: October 30, 2014 01:15 IST2014-10-30T01:15:08+5:302014-10-30T01:15:08+5:30
वर्सोवा पोलीस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजता घडली आहे.

वर्सोवा पोलीस ठाण्यात आरोपीचा मृत्यू
मुंबई : वर्सोवा पोलीस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजता घडली आहे. गोदीराम बाबूशहा शिवेकर (38) असे मृत आरोपीचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करीत असून, मृतदेह जे. जे. रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली आहे.
गोदीराम हा अंधेरी सात बंगला सागर कुटीर येथे राहत होता. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो तेथील फुटपाथवर राहत होता. मंगळवारी दुपारी त्याचे त्याच परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणा:या शीतल कामत याच्याशी भांडण झाले. या वादात कामतनेच त्याला मारहाण केली व स्वत: पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी दोघांवर मारामारीची तक्रार नोंदवली. याआधीही अदखलपात्रची गुन्ह्यांची नोंद असल्याने गोदीरामला अटक केली. मंगळवारी मध्यरात्री गोदीरामची प्रकृती बिघडल्याने त्याला कूपर रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचारानंतर परत आणले. मात्र सकाळी सहा वाजता त्याची प्रकृती खालावली. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुंधती राणो यांनी दिली.