Join us  

मर्यादा ओलांडल्यास येऊ शकतो बहिरेपणा, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 2:14 AM

वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी डीजेवरील बंदी कायम ठेवली आहे.

मुंबई : वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी डीजेवरील बंदी कायम ठेवली आहे. या निर्णयाचे स्वागत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला असून, वाढत्या डेसिबल्समुळे बहिरेपणाचा धोका संभावतो, असे म्हटले आहे. त्यामुळे ८० डेसिबल क्षमतेपेक्षा अधिकचा आवाज हा कायमच आरोग्याला धोकादायक असतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.विसर्जन मिरवणुकांमध्ये असा वा कोणत्याही सोहळ्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या डीजेच्या आवाजामुळे नागरिकांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. बऱ्याचदा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांच्या स्वास्थ्यावर अधिकाधिक दीर्घ परिणाम होण्याची शक्यता असते. याविषयी जे. जे. रुग्णालयाचे कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले की, ८0 डीबीपेक्षा जास्त आवाज धोकादायक आहे आणि आरोग्यावर लहान व दीर्घकालीन दोन्ही प्रकारचे परिणाम होतात. कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. क्रिस्टीना डिसूजा यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा अत्यंत स्वागतार्ह आहे. ध्वनिप्रदूषणामुळे डोकेदुखी, बहिरेपणा आणि मानसिक अशांतता या व्याधी उद्भवतात.

टॅग्स :प्रदूषणगणेशोत्सवगणेश चतुर्थी २०१८