Join us  

नागरिकांना दिलासा, घरगुती वीज बिल भरण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 2:09 AM

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे

नागपूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्याचे वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला तसे आदेश दिले आहेत. आता मार्च महिन्याचे वीज बिल १५ मेपर्यंत आणि एप्रिल महिन्याचे वीज बिल ३१ मेपर्यंत भरता येईल. औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज बिलातील स्थिर आकार तीन महिने रद्द करण्याच्या दुसऱ्याच दिवशी नागरिकांना हा दुसरा दिलासा देण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे महावितरणकडून २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद करण्यात आले आहे; सोबतच वीज बिलाची छपाई व वितरणदेखील बंद करण्यात आले आहे. परंतु महावितरणने अगोदरच हे स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत रीडिंग होत नाही, तोपर्यंत सरासरी वीज बिल पाठवले जातील. रीडिंग सुरू झाल्यावर त्याचे समायोजन करून ते बिल ग्राहकांना पाठवले जातील.ग्राहकांनी स्वत: मीटरचे रीडिंग पाठवामहावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वत: रीडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे अपलोड करावेत, यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रीडिंगचे वीज बिल प्राप्त होईल.

टॅग्स :मुंबईवीजनितीन राऊत