महामार्ग रुंदीकरणाला मार्च २०१६ ची डेडलाइन

By Admin | Updated: March 8, 2015 00:42 IST2015-03-08T00:42:13+5:302015-03-08T00:42:13+5:30

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम गेल्या चार वर्षापासून धिम्या गतीने सुरु आहे. रुंदीकरणाचे ८४ किमीचे काम मार्च २०१४ पर्यंत पूर्ण करावयाचे होते,

The Deadline of March 2016 for Highway Widening | महामार्ग रुंदीकरणाला मार्च २०१६ ची डेडलाइन

महामार्ग रुंदीकरणाला मार्च २०१६ ची डेडलाइन

पेण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम गेल्या चार वर्षापासून धिम्या गतीने सुरु आहे. रुंदीकरणाचे ८४ किमीचे काम मार्च २०१४ पर्यंत पूर्ण करावयाचे होते, मात्र मुदत संपूनही गेल्या वर्षभरात कामाबाबतची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करा अन्यथा संबंधित ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्वाणीचा इशारा सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पेण येथे पत्रकार परिषदेत दिला.
राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात कामाची पहाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व पर्यावरण मंत्री रामदास कदम, आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, भाजपा प्रवक्ते माधव भंडारी, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुका अध्यक्ष प्रमोद कावतकर, युवामोर्चा अध्यक्ष मोहन पाटील, कालिदास कोलंबकर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा सर्व्हे करुन याबाबत प्रसारमाध्यमांशी हितगुज साधले. २०१४ साली रुंदीकरणाचे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे संथगतीने चालले. या कामामध्ये भूसंपदनाचे ४५ दुरुस्तीचे मुद्दे या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यास मंत्र्यांनी फर्मावले, तसेच कर्नाळा अभयारण्यातील पर्यावरण विषयाची हाताळणी करण्यासाठी संबंधित फाईलवर लवकरच निर्णय घेऊ, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. भूसंपादनाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के कामाबाबत जिल्हाधिकारी रायगड यांनी ही फाईल पूर्ण करावी संबंधित बाधीत शेतकऱ्यांनी देयके वर्षभरात देण्याचे आदेश देण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: The Deadline of March 2016 for Highway Widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.