एसईबीसी उमेदवारांना आरक्षण विकल्प बदलण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:05 AM2021-06-19T04:05:14+5:302021-06-19T04:05:14+5:30

बारा परीक्षांसाठी बदलता येणार पर्याय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा (एसईबीसी) दावा केलेल्या उमेदवारांना ...

Deadline for change of reservation option for SEBC candidates is 23rd June | एसईबीसी उमेदवारांना आरक्षण विकल्प बदलण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदत

एसईबीसी उमेदवारांना आरक्षण विकल्प बदलण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदत

Next

बारा परीक्षांसाठी बदलता येणार पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा (एसईबीसी) दावा केलेल्या उमेदवारांना पात्रतेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) डिसेंबर २०१८ नंतर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींनुसार एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित पदांच्या आधारे घेतलेल्या भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर प्रलंबित आणि शिफारसी न केलेल्या बारा परीक्षांसाठी एसईबीसी आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांना १७ ते २३ जून या मुदतीत खुल्या किंवा ईडब्ल्यूएस यातील विकल्प ऑनलाइन निवडावा लागेल.

सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य शासनाने एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस यापैकी विकल्प निवडावा लागेल. दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा दावा सादर न करणाऱ्या उमेदवारांचा विचार केवळ खुल्या पदावरील निवडीसाठी केला जाईल. विकल्प सादर केलेल्या किंवा न केलेल्या उमेदवारांना पुन्हा दाव्यात बदल करता येणार नाही. एसईबीसी प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांनी आयोगाच्या ४ जानेवारी २०२१च्या प्रसिद्धीपत्रकानुसार कोणत्याही परीक्षांसाठी यापूर्वी विकल्प सादर केला असल्यास पुन्हा नव्याने विकल्प सादर करणे आवश्यक आहे.

नव्याने विकल्प न दिलेल्या उमेदवारांचा खुल्या पदांवरील निवडीसाठी विचार केला जाईल. शिवाय खुल्या आणि ईडब्ल्यूएस घटकाच्या लाभासाठी विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित जाहिरातीत विहित केलेल्या अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ३१ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घेऊन प्रमाणपत्र पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. अर्ज केलेल्या प्रत्येक परीक्षेसाठी विकल्प निवडणे अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

* या परीक्षांसाठी उमेदवार बदलू शकणार आरक्षणाचा प्रवर्ग

परिपत्रकानुसार महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०१९, पशुधन विकास अधिकारी गट अ, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९, महाराष्ट्र विद्युत सेवा अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९, राज्य सेवा पूर्वपरीक्षा, सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा २०२०, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त गट अ, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट ब, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट अ संयुक्त पूर्वपरीक्षा २०२०, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२०, वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ आदिवासी विकास विभाग, अनुवादक (मराठी) गट अ या बारा परीक्षांतील उमेदवार आरक्षणाचा प्रवर्ग बदलू शकतील.

..........................................

Web Title: Deadline for change of reservation option for SEBC candidates is 23rd June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.