‘मरे’ विस्कळीत
By Admin | Updated: November 3, 2015 02:41 IST2015-11-03T02:41:35+5:302015-11-03T02:41:35+5:30
ठाण्याहून सीएसटीकडे येणाऱ्या डाऊन लोकल रात्री २० मिनिटे उशिरा धावत होत्या. ठाणे ते मुलुंडदरम्यानच्या स्लो ट्रॅकवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थिती उद्भवली.

‘मरे’ विस्कळीत
मुंबई : ठाण्याहून सीएसटीकडे येणाऱ्या डाऊन लोकल रात्री २० मिनिटे उशिरा धावत होत्या. ठाणे ते मुलुंडदरम्यानच्या स्लो ट्रॅकवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थिती उद्भवली.
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या सेंट्रल व हार्बर मार्गावरील लोकलसेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. रात्री दहाच्या सुमारास ठाणे ते मुलुंड मार्गावरील धिम्या गतीच्या ट्रॅकवर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सीएसटीकडे येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल सुमारे अर्धा तास खोळंबल्या. अखेर या गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या. प्रवाशांनी या संदर्भातील माहिती विचारण्यासाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेथूनही उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे नागरिकांना
प्रचंड मनस्ताप सहन करावा
लागला. (प्रतिनिधी)