डिङोलचे दर नियंत्रणमुक्त करा
By Admin | Updated: September 16, 2014 03:07 IST2014-09-16T03:07:56+5:302014-09-16T03:07:56+5:30
कपातीचा फायदा घेत केंद्र सरकारने डिङोलचे दर नियंत्रणमुक्त करावेत, अशी सूचना भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सरकारला केली आहे.

डिङोलचे दर नियंत्रणमुक्त करा
मुंबई : गेल्या महिनाभरापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमतीत आलेल्या कपातीचा फायदा घेत केंद्र सरकारने डिङोलचे दर नियंत्रणमुक्त करावेत, अशी सूचना भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सरकारला केली आहे. येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
चालू खात्यातील वित्तीय तूट आटोक्यात आणण्यासाठी आणि इंधनापोटी सरकारला तिजोरीतून द्याव्या लागणा:या अनुदानामुळे तिजोरीवर पडणारा ताण आटोक्यात आणण्यासाठी जानेवारी 2क्13मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने डिङोलच्या किमती अंशत: नियंत्रणमुक्त करत प्रति महिना प्रति लीटर 5क् पैशांनी डिङोलच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे आतार्पयत डिङोलच्या किमतीमध्ये 11 रुपये 81 पैशांची वाढ होतानाच डिङोलवरील प्रति लीटर तोटय़ाचे प्रमाणही 8 पैशांवर आले आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती 1क्क् डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी झाल्यामुळे आयात खर्चात कपात होण्यासोबतच चालू खात्यातील वित्तीय तूटही कमी होणार आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने डिङोलच्या किमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची सूचना राजन यांनी केली आहे. तेल कंपन्यांच्या आगामी बैठकीत उर्वरित तोटा भरून काढण्याच्या अनुषंगाने डिङोलच्या दरात किमान वाढ होईल व त्यानंतर डिङोलचे दर नियंत्रणमुक्त करण्याच्या दृष्टीने सरकार पावले उचलेल. (प्रतिनिधी)
‘जन-धन’बाबत बँकांना सावधानतेचा इशारा
च्केंद्र सरकारच्या जन-धन योजनेला बँका जोरदार प्रतिसाद देत असल्या तरी रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मात्र याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.
च्केवळ मोठय़ा संख्येने खाती उघडताना या योजनेच्या मूळ उद्दिष्टांशी तडजोड नको, असा सल्ला त्यांनी दिला आहे. जेव्हा एखादी योजना हाती घेतली जाते तेव्हा ती फसणार नाही, याची खात्री बाळगली पाहिजे, असे राजन म्हणाले.
च्केवळ गती आणि संख्या एवढय़ावरच लक्ष नको, असेही त्यांनी सांगितले. जर या नव्या खातेदारांना वाईट अनुभव आला, तसेच या नव्या खात्यांमध्ये व्यवहारच झाले नाहीत आणि डुप्लिकेट खाती उघडली गेली असतील, तर ही योजना म्हणजे अपव्यय ठरेल, असाही इशारा त्यांनी या वेळी दिला.
च्जर आपण त्यांना चांगला अनुभव देऊ शकलो नाही तर हे खातेदार व्यवहार करणार नाहीत. त्यामुळेही खातेदारांचे मत चांगले होईल. यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी सांगितले. सरकारकडून संख्येवर भर दिला जात असतानाच राजन यांनी हा इशारा दिला.
च्जन-धन योजनेत खाते उघडणा:यांपैकी अनेक खातेदार पहिल्यांदाच बँक व्यवहार करणारे असू शकतात.
औद्योगिक उत्पादनात
वाढ, परंतु असंतुलित
जागतिक मंदीचे सावट उठल्यानंतर आता भारतीय अर्थव्यवस्थेतही सुधार दिसून येत आहे. औद्योगिक उत्पादनाचे जे आकडे येत आहेत ते समाधानकारक आहेत. मात्र, तरीही हे प्राथमिक आकडे असल्याने त्यात असंतुलन दिसून येत असल्याचे राजन म्हणाले. मूलभूत उत्पादन उद्योगात काही तेजी दिसून आली परंतु गेल्या महिन्यात पुन्हा या उद्योगाच्या आकडेवारीत घसरण दिसून आली आहे. या तुलनेत वाहन उद्योगातील तेजी कायम आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्रने समतोल वेग पकडलेला नसल्याचे राजन म्हणाले.