दोन दशकानंतर ‘डीडीएलजे’वर पडदा!
By Admin | Updated: February 20, 2015 01:40 IST2015-02-20T01:40:52+5:302015-02-20T01:40:52+5:30
सलग दोन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करुन सिनेमाचा ट्रेंड बदलणाऱ्या ‘डीडीएलजे’ अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाचे प्रदर्शन मराठा मंदिर सिनेमागृहाने थांबविले.

दोन दशकानंतर ‘डीडीएलजे’वर पडदा!
मुंबई : सलग दोन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करुन सिनेमाचा ट्रेंड बदलणाऱ्या ‘डीडीएलजे’ अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाचे प्रदर्शन मराठा मंदिर सिनेमागृहाने थांबविले. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता या चित्रपटाचा शेवटचा शो झाला.
शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘डीडीएलजे’ आॅक्टोबर १९९५ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत तो मराठा मंदिरमध्ये दाखवला जात होता. याआधी ‘शोले’ या सिनेमाचे सलग ५ वर्ष शो सुरु होते. मात्र ‘डीडएलजे’ने त्यालाही मागे टाकीत नवा विक्रम केला. १००० आठवड्यांच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा नवा ट्रेलरही रिलीज केला होता. सलग १ हजार १० आठवडे चालल्यानंतर आज शेवटचा शो दाखवला. यावेळी २१० प्रेक्षकांनी हजेरी लावली. गेली काही आठवडे प्रेक्षकांची संख्या कमी होत गेली. ११०५ आसनसंख्या असलेल्या थिएटरमध्ये केवळ १००-२०० प्रेक्षकच हजर असतात. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे ‘मराठा मंदिर’चे व्यवस्थापक मनोज देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)