दया नायक यांची ‘एटीएस’मधून गोंदियाला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:06 IST2021-05-07T04:06:51+5:302021-05-07T04:06:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहशतवादविरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दया नायक यांची गोंदियाला तडकाफडकी बदली करण्यात आली. ...

Daya Nayak transferred from ATS to Gondia | दया नायक यांची ‘एटीएस’मधून गोंदियाला बदली

दया नायक यांची ‘एटीएस’मधून गोंदियाला बदली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहशतवादविरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दया नायक यांची गोंदियाला तडकाफडकी बदली करण्यात आली. पोलीस मुख्यालयातून गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी केले असून, त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याची सूचना एटीएस प्रमुखांना करण्यात आली आहे.

संजय पांडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा सांभाळल्यापासून वादग्रस्त आणि एकाच ठिकाणी ठिय्या मांडून असलेल्या अधिकाऱ्यांवर त्यांनी कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. सोमवारी (दि. ३) पाच पोलीस निरीक्षकांची विदर्भ व मराठवाड्यात उचलबांगडी करण्यात आली होती. बुधवारी (दि. ५) दया नायक यांची प्रशासकीय कारणास्तव गोंदिया जिल्ह्यात जात पडताळणी प्रमाणपत्र समितीमध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली. महासंचालकांच्या वतीने अप्पर महासंचालक (आस्थापना) के. के. सरंगल यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

Web Title: Daya Nayak transferred from ATS to Gondia