मुंबई : दिवसभर टॅक्सी चालवून रात्री मॅनहोलची झाकणे चोरणाºया दुकलीला मंगळवारी मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हयातुल्ला खान आणि शफीउल्ला खान अशी अटक आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही चेंबूरच्या वाशीनाका परिसरात राहतात. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत ते टॅक्सी चालवत. त्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत मॅनहोलवर बसवलेली बीडाची झाकणे चोरत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. चेंबूर येथील भंगारवाल्याकडे ते चोरी केलेली झाकणे विकत होते. २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री मुलुंड पश्चिमेकडील बाळराजेश्वर, भक्तीमार्ग परिसरात सात ठिकाणी मॅनहोलवरील झाकणे या दोघांनी चोरली होती.याच मार्गावर पहाटेच्या वेळी एका मॅनहोलमध्ये पडून एक महिला गंभीर जखमी झाली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पालिकेने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
दिवसा टॅक्सीचालक, रात्री चोर! दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 05:42 IST