रक्षाबंधनाच्या दिवशी हाल
By Admin | Updated: August 9, 2014 01:02 IST2014-08-09T01:02:43+5:302014-08-09T01:02:43+5:30
सोयीसुविधा आणि सुरक्षेचे प्रश्न सोडवताना मुंबईकरांसाठी आकडता हात घेणा:या मध्य रेल्वेने रक्षाबंधनाच्या दिवशी मेगाब्लॉक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी हाल
>मुंबई : सोयीसुविधा आणि सुरक्षेचे प्रश्न सोडवताना मुंबईकरांसाठी आकडता हात घेणा:या मध्य रेल्वेने रक्षाबंधनाच्या दिवशी मेगाब्लॉक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सणाच्या निमित्ताने लोकल प्रवास करत घराबाहेर पडणा:या लाखो मुंबईकरांचे त्यामुळे हाल होणार आहेत. मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर कुर्ला ते सीएसटी तसेच वडाळा रोड ते माहीम दरम्यान ब्लॉक होईल. पश्चिम रेल्वेने मात्र शुक्रवारी मध्यरात्रीच ब्लॉक घेऊन रविवारच्या जम्बोब्लॉकमधून माघार घेतली आहे.
रविवारी 10 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन साजरा केला जाणार असून मुंबईत हा सण प्रत्येक वर्षी मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. सणासुदीचा दिवस असल्याने या दिवशी घराबाहेर पडणा:यांची संख्या अधिक असते. रिक्षा, टॅक्सी, बस सेवांबरोबरच लोकलचा प्रवास यावेळी सुलभ पडतो. सणासुदीच्या काळात लोकलने लाखो प्रवासी प्रवास करत असल्याचे नेहमीच दिसून येते. मात्र रक्षाबंधनासारखा सणासुदीचा दिवस असूनही या दिवशी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकलचा आधार घेत या दिवशी प्रवास करणा:या लाखो प्रवाशांच हाल होणार आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर सकाळी दहा ते पावणोतीन वाजेर्पयत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर अप जलद लोकल गाडय़ांना ठाण्यानंतर मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. हार्बर मार्गावर कुर्ला ते सीएसटी अप मार्गावर आणि वडाळा रोड ते माहीम अप आणि डाऊन मार्गावर मेन लाइनच्या वेळेतच ब्लॉक घेण्यात येईल. सीएसटी ते वांद्रे दरम्यानची सेवा रद्द करण्यात येणार आहे. सीएसटीकडे जाणारी हार्बर सेवा कुर्लाच्या मेन लाइनमार्गे चालवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बरवासीयांचे प्रचंड हाल होणार आहेत. रक्षाबंधन असल्याने पश्चिम रेल्वेने शुक्रवारी मध्यरात्रीच वसई रोड ते विरार दरम्यान ब्लॉक घेतला आणि रविवारी होणा:या ब्लॉकमधून सुटका केल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गजानन महतपूरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
च् सीएसटीकडे जाणारी हार्बर सेवा कुर्लाच्या मेन लाइनमार्गे चालवण्यात येईल. त्यामुळे हार्बरवासीयांचे प्रचंड हाल होतील. रक्षाबंधनामुळे पश्चिम रेल्वे शुक्रवारीच ब्लॉक घेणार आहे.
च्हार्बर मार्गावर कुर्ला ते सीएसटी अप मार्गावर आणि वडाळा रोड ते माहीम अप आणि डाऊन मार्गावर मेन लाइनच्या वेळेतच ब्लॉक घेण्यात येईल. सीएसटी ते वांद्रे दरम्यानची सेवा रद्द असेल.