२० वर्षांपासून फरार असलेला दाऊदचा हस्तक अटकेत
By Admin | Updated: March 14, 2016 02:24 IST2016-03-14T02:24:37+5:302016-03-14T02:24:37+5:30
गेल्या २० वर्षांपासून फरार असलेल्या गँगस्टर दाऊदचा हस्तक नदिम मिस्त्री अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. शनिवारी त्याला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे

२० वर्षांपासून फरार असलेला दाऊदचा हस्तक अटकेत
मुंबई : गेल्या २० वर्षांपासून फरार असलेल्या गँगस्टर दाऊदचा हस्तक नदिम मिस्त्री अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. शनिवारी त्याला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद गँगमधील गँगस्टर मंगेश पवार याला वांद्रे येथील हाजी नावाच्या इसमावर गोळीबार करण्यासाठी नदिमने मदत केली होती. मिस्त्री हा गुजरात येथील अकोटामध्ये लपून बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, शनिवारी त्याला मिस्त्री गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)