दत्ता खानविलकर यांचे निधन

By Admin | Updated: November 28, 2014 02:02 IST2014-11-28T02:02:26+5:302014-11-28T02:02:26+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड्. दत्ता खानविलकर (वय 92) यांचे गुरुवारी सायंकाळी साडेआठ वाजता निधन झाले.

Datta Khanvilkar dies | दत्ता खानविलकर यांचे निधन

दत्ता खानविलकर यांचे निधन

>अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड्. दत्ता खानविलकर (वय 92) यांचे गुरुवारी सायंकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी 11:3क् वाजता अलिबाग येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई असा मोठा परिवार आहे. 
अॅड. खानविलकर हे यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात खारभूमी खात्याचे मंत्री होते. गेले अनेक वर्षे त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे ते पहिले अध्यक्ष होते. निष्णात फौजदारी वकील अशी त्यांची ओळख होती. त्यांचे पार्थिव अलिबाग येथील निवासस्थानी शुक्रवारी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रायगड जिल्हय़ातील अनेक प्रश्न सोडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. (प्रतिनिधी) 

Web Title: Datta Khanvilkar dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.