Join us
Daily Top 2Weekly Top 5

डेटिंग ॲपची ‘डेट’ ठरली घातक; तरुणाला लुटले, वांद्रे पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:12 IST

तक्रारदार तरुण हा २० वर्षांचा असून, तो वांद्रे परिसरातील रहिवासी आहे. ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराची डेटिंग ॲपवरून रिझवान नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली.

गौरी टेंबकर-कलगुटकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : डेटिंग ॲपद्वारे तरुणाला जाळ्यात ओढत मारहाण व लूट केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात घडली. वांद्रे पोलिसांनी अवघ्या तीन तासांत मोहम्मद रिझवान मोहम्मद इम्रान शेख (१९, रा. डोंगरी) आणि मोहम्मद अली मोहम्मद शफीक कुरेशी (२२, रा. बेहरामपाडा) यांच्या मुसक्या आवळल्या.

तक्रारदार तरुण हा २० वर्षांचा असून, तो वांद्रे परिसरातील रहिवासी आहे. ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराची डेटिंग ॲपवरून रिझवान नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली.

दुचाकीच्या नंबरमुळे लागला छडा

तरुणाने आरोपींच्या दुचाकीचा नंबर एमएच ०२ जीएम १३६३ (काळी सुझुकी बर्गमन) लक्षात ठेवला आणि वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अवघ्या तीन तासांत जुहू चौपाटी परिसरातून त्यांना दुचाकीसह ताब्यात घेतले.

क्यूआर कोडद्वारे १८ हजार वळते

रिझवानने तरुणाला वांद्रे तलावाजवळ भेटण्यास बोलावले. तक्रारदार तेथे पोहोचताच रिझवान दुचाकीवर आला आणि जबरदस्तीने त्याला गाडीवर बसवले. यानंतर एस.व्ही. रोडमार्गे खारच्या दिशेने जात असताना मरिआई माता मंदिराजवळ त्यांचा दुसरा साथीदार अली त्यांच्यात सामील झाला.

दोघांनी मिळून तरुणाला कार्टर रोड आणि बँडस्टँड परिसरात फिरवले. कार्टर रोडवरील डॉग पार्कजवळ थांबून दोघांनी तक्रारदाराला मारहाण केली आणि त्याचा मोबाइल हिसकावून घेतला.

फोन पे ॲपचा पासवर्ड मागून घेतला.

दोघांनी तरुणाला माझगाव येथील डॉकयार्ड रोड रेल्वेस्थानक परिसरात नेले.

तेथे रेल्वे पुलाखालील एका मोबाइल दुकानात क्यूआर कोडद्वारे तरुणाच्या खात्यातून १८ हजार रुपये वळते करून रोख रक्कम घेतली. त्यानंतर आरोपींनी मोबाइल परत देत दुचाकीवरून पळ काढला.

English
हिंदी सारांश
Web Title : Dating app 'date' turns deadly; youth robbed, culprits arrested.

Web Summary : A Bandra youth was lured via dating app, assaulted, and robbed. Bandra police swiftly arrested two suspects, recovering the stolen items and money transferred via QR code. The victim noted the motorcycle number, aiding rapid apprehension.