राज-उद्धव यांच्या सभांसाठी तारीख पे तारीख!
By Admin | Updated: October 3, 2014 23:00 IST2014-10-03T23:00:02+5:302014-10-03T23:00:02+5:30
गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेसह युती आणि आघाडीने आचारसंहिता लागताच प्रचारसभांचा धडाका लावला होता.
राज-उद्धव यांच्या सभांसाठी तारीख पे तारीख!
>अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली
गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेसह युती आणि आघाडीने आचारसंहिता लागताच प्रचारसभांचा धडाका लावला होता. या वेळेस मात्र परिस्थिती उलट असून मोठय़ा नेत्यांसह पक्षश्रेष्ठींची तारीख मिळवताना ठिकठिकाणच्या मतदारसंघांतील उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यातच विशेषत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तारखाही न मिळाल्याने त्यांच्या कार्यकत्र्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एकीकडे ही धास्ती असतानाच दुसरीकडे मध्यवर्ती मैदानांची वानवा असल्याने आणि न्यायालयाच्या आदेशांनुसार रस्त्यावर सभा घेणो नियमांचे उल्लंघन असल्याने सर्वच पक्षांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी डोंबिवलीसह भिवंडी, कल्याण, बदलापूर येथे येऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आगामी काळातही विविध नेते येणार असून दिवसातून आसपासच्या चार-पाच मतदारसंघांच्या एकत्रित तसेच विविध ठिकाणी सभा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या तुलनेने अन्य पक्षांमध्ये वरिष्ठ पातळीवरील नेते नेमके कधी येणार, याची चाचपणी सुरू असून त्या तारखा मिळवण्यातच प्रचाराचा वेळ वाया जात असल्याची भावना आहे.
राज यांनी डोंबिवलीत यावे की कल्याणमध्ये तसेच या दोन्ही ठिकाणी आले तरीही मैदान कुठले घ्यायचे, यावरून त्या-त्या मतदारसंघांमध्ये आपापसांत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचेही असेच काहीसे असून त्यांनाही अद्यापही तारखा मिळाल्या नसल्याचे शहरप्रमुखांनी स्पष्ट केले. नियोजनबद्ध कार्यक्रमाबाबत समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा कार्यकत्र्यामध्ये सुरू आहे. अचानकपणो स्वतंत्रपणो निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पक्षश्रेष्ठींसह लोकप्रतिनिधींची विचित्र गोची झाली आहे.
नेते आले तरीही गर्दी होईल का? गर्दी होण्यासाठी संध्याकाळची नेत्यांची वेळ मिळेल का? त्यामध्ये नागरिकांचा उत्साह टिकवण्यासाठी सुटीचा वार मिळेल का? या सर्वाची जुळवाजुळव झाल्यावर मध्यवर्ती मैदान आहे का? ते अन्य कोणी घेतलेले नाही ना.. यासारख्या विविध समस्यांमुळे प्रचार करायचा की, सभा घ्यायची, असा पेच पक्षांसमोर आहे. त्यात डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण या ठिकाणी मोजकीच मैदाने आहेत.
डोंबिवलीत डीएनसी, भागशाळा मैदान, नेहरू ग्राउंड आदी मैदाने आहेत. त्यातील नेहरू मैदानात अभावानेच सभा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भागशाळा मैदान हे योग्य असले तरीही ते पश्चिमेकडे असल्याने शहरांतर्गत वाहतूककोंडीसह रस्त्यांची दुरवस्था अशा असंख्य बाबी आहेत.
डोंबिवली व कल्याण ग्रामीणसाठी डीएनसी हे मध्यवर्ती असले तरीही एकाच वेळी सर्व पक्षांना ते उपलब्ध होणो तितकेसे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तिसरा पर्याय प्रीमिअरसमोरील पटांगणात सभा घेता येईल का, असा प्रस्ताव विचाराधीन आहे.
मात्र, शहराच्या बाहेर ही जागा असून डोंबिवली मतदारसंघातील कार्यकर्ते, नागरिक त्या ठिकाणी येतील का, या शंकेने पदाधिका:यांना अस्वस्थ केले आहे. त्या ठिकाणी सभा घेतल्यास शहरांतर्गत वाहतूककोंडी, रस्ते, अन्य दुर्दशा नेत्यांना कशी दिसणार आणि ते सभेत मुद्दे आल्याशिवाय मजा येणार नाही, अशीही चर्चा असल्याने भागशाळा आणि डीएनसी या दोन मैदानांवरच भिस्त असल्याचे स्पष्ट होत आहे.
या वेळेस राज काय बोलणार?
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेनेला लक्ष्य करत बाळासाहेब ठाकरेंच्या आजारपणातील चिकन सूप आणि वडे काढले होते. त्याचे परिणाम त्यांना निकालानंतर दिसून आले होते. या विधानसभा निवडणुकीत राज यांची तोफ कोणाला टार्गेट करणार तसेच त्यातून पक्षाच्या लोकप्रतिनिधींना किती लाभ होणार, याची समीकरणो मांडण्यात येत आहेत. त्यासाठी संबंधितांकडून मुद्देही तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
कल्याण-डोंबिवलीसाठी वेळापत्रकात वेळ नाही? शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील दौ:याचे पत्रक काढण्यात आल्याची चर्चा कार्यकत्र्यामध्ये आहे. मात्र, त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीसाठी वेळ दिला नसल्याचीही चर्चा सुरू होती. मुरबाड आणि ठाणो या ठिकाणांचा मात्र उल्लेख असल्याचेही एकाने सांगितले.