दाखल्यांसाठी तारीख पे तारीख
By Admin | Updated: June 20, 2015 23:04 IST2015-06-20T23:04:25+5:302015-06-20T23:04:25+5:30
महाविद्यालय तसेच शालेय प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले शाळा सुरू झाली तरीही पालकांना मिळालेले नाहीत. परिणामी, पालघर तहसिल

दाखल्यांसाठी तारीख पे तारीख
मनोर : महाविद्यालय तसेच शालेय प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले शाळा सुरू झाली तरीही पालकांना मिळालेले नाहीत. परिणामी, पालघर तहसिल कार्यालयातील एक खिडकी समोर विद्यार्थी आणि पालकांच्या रांगाच दिसत आहेत. तरीही या दाखल्यांसाठी तारीख पे तारीख मिळते आहे. तर गावपातळीवर घर पोच दाखले वाटप कार्यक्रमाची केवळ औपचारिकताच महसुल विभागाचे अधिकारी कर्मचारी करताना दिसत आहे.
शाळा, अॅडमीशन साठी लागणारे नॉनक्रिमीनल, क्रिमीनल, जातीचे, उत्पन्नाचे असे अनेक प्रकारचे दाखले सध्या मुलांना शिक्षणासाठी तसेच इतर कामांसाठी लागतात. सध्या हेच दाखले घेण्यासाठी तहसिल कार्यालयात ‘एक खिडकी’ येथे दाखले घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. पोच पावती दाखविली तर तुमचा दाखला आलेला नाही असे उत्तर मिळते. अनेक दिवसापासून फक्त तारखाच मिळत आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड तर बसतोच पण मुलांचे शाळा प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या पालकांची मोठी कुचंबणा होताना दिसते. पालघर तहसिलदार विभागातर्फे विविध तलाठी सजा मंडळ अधिकारी कार्यालय अंतर्गत येणारे गावांमध्ये घरपोच दाखले वाटप कार्यक्रम घेतले जातात तर एक खिडकी दाखल्यांसाठी तारखा दिल्या जातात. (वार्ताहर)