अकराशे ठिकाणी डासउत्पत्ती

By Admin | Updated: April 26, 2015 00:48 IST2015-04-26T00:48:52+5:302015-04-26T00:48:52+5:30

मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होते. सध्याच्या रणरणत्या उन्हात पाणी साचणार तरी कसे? त्यामुळे उन्हाळ्यात डासांच्या उत्पत्तीचा धोका नाही.

Dasuuptiti in eleven places | अकराशे ठिकाणी डासउत्पत्ती

अकराशे ठिकाणी डासउत्पत्ती

पूजा दामले ल्ल मुंबई
मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होते. सध्याच्या रणरणत्या उन्हात पाणी साचणार तरी कसे? त्यामुळे उन्हाळ्यात डासांच्या उत्पत्तीचा धोका नाही... या भ्रमात मुंबईकरांनी राहू नये. जानेवारी ते मार्च या कालावधीत महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने डासांच्या उत्पत्तीची तब्बल १ हजार ११९ स्थाने शोधून काढत त्याबद्दल साडेपाच लाखांचा दंडही वसूल केला आहे.
मुंबईत २०१४ मध्ये डेंग्यूची साथ वाढली होती. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्याचे आढळून आले होते. जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत एडिस इजिप्ती डासांची ८३५ तर प्लाझमोडियम डासांची २८४ उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. पाण्याची गळती होणाऱ्या म्हणजे पाइपलाइनची जोडणी, नळ अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होत आहे, असे कीटकनाशक विभागप्रमुख राजन नारिंगे्रकर यांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांत ३ हजार ८३९ कारवाया करण्यात आल्या असून १२५ गुन्हे दाखल केले आहेत. नोटीस देऊनही सुधारणा न केलेल्यांकडून ५ लाख ६१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी कमी प्रमाणात पाण्याची गळती होत असते. पण याकडे दुर्लक्ष होते. खड्डा असल्यास त्यात पाणी साचते. याच ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याचे नारिंग्रेकर यांनी सांगितले. प्लाझमोडियम जातीच्या डासांमुळे मलेरिया तर एडिस इजिप्ती जातीच्या डासांमुळे डेंग्यूची लागण होते. गेल्या वर्षी डेंग्यूची साथ वाढल्यावर महापालिकेने विविध उपाययोजना केल्या. पण या उपाययोजनांमध्ये सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग नसल्याने त्यास अद्याप यश आले नाही.

च्मलेरिया रोखण्याबाबत कोणताही उपक्रम आखताना अधिसूचित नसलेल्या अवैध झोपडपट्ट्या आणि स्थलांतरित व्यक्ती ही दोन मोठी आव्हाने असल्याचे आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वतीने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

इतर राज्यांतही झोपडपट्ट्यांसाठी विशेष आरोग्य उपक्रमांचे आयोजन करणारी उदाहरणे अत्यंत कमी आहेत. या ठिकाणी स्वयंसेवी संस्था काम करत असतात. पण त्याचे क्षेत्र कमी असते. याचबरोबरीने झोपडपट्ट्यांमध्ये लोकसंख्या जास्त असते. शिक्षण कमी असते, स्त्री-पुरुष समानता नसते, पाण्याची सोय नाही, स्वच्छता नाही यामुळेही मलेरियाचे प्रमाण वाढते.

मुंबई शहरात दरवर्षी २ लाख कामगार स्थलांतरित होत असतात. हे कामगार बांधकामाच्या साइट्वर कामे करतात. एक बांधकाम पूर्ण झाल्यावर ते दुसऱ्या ठिकाणी जातात. या वेळी कामगार झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. स्थलांतरित व्यक्तींमुळे आजार पसरतो. यांच्यावर लक्ष ठेवणे शक्य होत नाही, असे अहवालात नमूद केले आहे. याच बरोबरीने कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. निधीच्या कमतरतेमुळे प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम आखले जातात. याचबरोबरीने नवीन कर्मचारी वर्ग घेतला जात नाही. मलेरिया रोखण्यासाठी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

च्मलेरिया रोखण्यात महापालिकेला काही प्रमाणात यश आले तरी अजूनही मलेरियाचे शून्य लक्ष्य गाठता आलेले नाही. त्यासाठी महापालिकेने फाउंडेशनला एक अहवाल तयार करण्यास सांगितला होता. या अहवालात मलेरियासाठी उपक्रम राबवताना येणाऱ्या आव्हानांचा उल्लेख आहे. मुंबईत सुमारे ६२ टक्के जनता झोपडपट्टीत राहते. अनेक झोपडपट्ट्या या अधिसूचित नसल्याने येथे आरोग्यसेवा देणे सहज शक्य होत नाही.

Web Title: Dasuuptiti in eleven places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.