अंधारातच उपचार सुरू , विजेचे ८० हजारांचे बिल थकले
By Admin | Updated: January 2, 2016 08:33 IST2016-01-02T08:33:36+5:302016-01-02T08:33:36+5:30
धसई येथील शासकीय आरोग्य केंद्राचे गेल्या नऊ महिन्यांचे ८० हजार रु पयांचे वीजबिल थकल्याने गेला आठवडाभर या आरोग्य केंद्रात अंधार आहे.

अंधारातच उपचार सुरू , विजेचे ८० हजारांचे बिल थकले
- राजेश भांगे, शिरोशी
धसई येथील शासकीय आरोग्य केंद्राचे गेल्या नऊ महिन्यांचे ८० हजार रु पयांचे वीजबिल थकल्याने गेला आठवडाभर या आरोग्य केंद्रात अंधार आहे.
आदिवासी दुर्गम भागातील ५० ते ६० खेडेगावांतील नागरिक मोफत आरोग्य सेवा घेण्याकरिता धसई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर येतात. मात्र, सध्या येथे अंधार असल्याने बाळंतपणाच्या केसेस अन्यत्र पाठविल्या जातात. सर्पदंश, विचूदंश झालेल्या रु ग्णांवर मेणबत्तीच्या प्रकाशात उपचार केले जात आहेत. या दवाखान्यात ३५ कर्मचारी व दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. (वार्ताहर)
एप्रिल महिन्यापासून या आरोग्य केंद्राने विजेचे बिल भरलेले नाही. वारंवार नोटिसा पाठवूनही बिल भरण्यात न आल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे.
- प्रदीप म्हस्के, उपअभियंता, महावितरण