अंधेरीत वकिलाने चौघांना उडवले
By Admin | Updated: August 15, 2014 02:28 IST2014-08-15T02:28:14+5:302014-08-15T02:28:14+5:30
अंधेरी पश्चिम लोखंडवाला येथील जॉगर्सपार्कजवळ बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान एका कारने चौघांना धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले

अंधेरीत वकिलाने चौघांना उडवले
मुंबई : अंधेरी पश्चिम लोखंडवाला येथील जॉगर्सपार्कजवळ बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान एका कारने चौघांना धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी कारचालक अॅड. विष्णू दांडेकर (६२) याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. दांडेकरने गाडी चालविताना मद्यप्राशन केले होते का, यासाठी रक्ताची तपासणी करण्यात आली आहे, त्याचा अहवाल अजून यायचा आहे. दरम्यान, दांडेकरची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
बाइकस्वाराचा मृत्यू
चारकोप येथे गुरुवारी दुपारी तोल जाऊन बेस्ट बसला धडकल्याने हिमांशू मेस्त्री (३७) यांचा मृत्यू झाला आहे. चारकोप पोलीस ठाण्यासमोरील मेडिकल दुकानातून मेस्त्री सामान घेऊन घरी जात असताना हा अपघात झाला. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी नोंद केली असून बसचालक प्रताप कोळीला ताब्यात घेतले.
गँगस्टर गजाआड
गँगस्टर विजय केदारे ऊर्फ विजू याचा साथीदार कृष्ण मुबारक सितखंडोर ऊर्फ करी याला गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटने गजाआड केले. अॅण्टॉप हिलमध्ये घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यात करी गेली दोन वर्षे फरार होता. आॅक्टोबर २०१०मध्ये केदारेच्या आदेशावरून त्याच्या टोळीने मंगेश विचारे या तरु२णाच्या हत्येचा प्रयत्न केला होता.