वैशाली नगरमध्ये दरेकर यांना पाठिंबा

By Admin | Updated: October 9, 2014 02:02 IST2014-10-09T02:02:25+5:302014-10-09T02:02:25+5:30

गेल्या ५ वर्षांत मागाठाणे परिसरातील प्रत्येक विभागात मूलभूत सुविधा पुरवण्यावर मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी भर दिला आहे

Darekar support in Vaishali Nagar | वैशाली नगरमध्ये दरेकर यांना पाठिंबा

वैशाली नगरमध्ये दरेकर यांना पाठिंबा

मुंबई : गेल्या ५ वर्षांत मागाठाणे परिसरातील प्रत्येक विभागात मूलभूत सुविधा पुरवण्यावर मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी भर दिला आहे. मूलभूत सुविधा पुरविताना अडचणी आल्यानंतरही त्या दूर सारत सुविधा पुरवण्यावर भर दिल्याचे दरेकर यांनी वैशाली नगरमधील जाहीर सभेत सांगितले.
वैशाली नगर वसाहतीतील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. वैशाली नगरच्या रहिवाशांकरिता नवीन बससेवा आणि बसस्टॉप बनवण्यात आला. वैशाली नगरमध्ये यापुढेही विकासकामे सुरूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चारही प्रवीण दरेकर यांनी केला. विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दरेकर यांनी वैशाली नगरवासीयांना दिले.
दहिसर पूर्व प्रभाग क्रमांक चारमधील वैशाली नगर येथील जाहीर सभेत दरेकर बोलत होते. दिवसभर पदयात्रा काढून सायंकाळी जाहीर सभा घेण्यावर दरेकर भर देत आहेत. या माध्यमातून अधिकाधिक लोकांशी ते संवाद साधत आहेत. वैशाली नगर परिसरातील मराठी नागरिक दरेकर यांच्या पाठीशी आहेत. विकासाची कामे यापुढेही सरूच ठेवणार असल्याचे दरेकर यांनी वैशाली नगरमधील रहिवाशांना संबोधित करताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Darekar support in Vaishali Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.