उत्तर प्रदेशातील दरोडेखोरांना वांद्रे येथे अटक

By Admin | Updated: April 9, 2016 03:55 IST2016-04-09T03:55:31+5:302016-04-09T03:55:31+5:30

उत्तरप्रदेशातील बँकेत दरोडा टाकण्यासाठी सुरक्षा रक्षकाची हत्या करुन पसार झालेल्या टोळीच्या वांद्रे पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Daredevils in Uttar Pradesh arrested in Bandra | उत्तर प्रदेशातील दरोडेखोरांना वांद्रे येथे अटक

उत्तर प्रदेशातील दरोडेखोरांना वांद्रे येथे अटक

मुंबई : उत्तरप्रदेशातील बँकेत दरोडा टाकण्यासाठी सुरक्षा रक्षकाची हत्या करुन पसार झालेल्या टोळीच्या वांद्रे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. कुमारस्वामी जगतराम प्रजापती (२२) आणि अजगर अली खलील तेली (३४) अशी अटक दुकलींची नावे असून त्यांच्याकडून देशी बनावटीच्या दोन कट्ट्यांसह नऊ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
दोन दरोडेखोर शास्त्री नगर परिसरात येणार असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय संजय भोळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने दुपारी साडे तीनच्या सुमारास या परिसरात सापळा रचला. ज्यात हे दोघे अडकले. (प्रतिनिधी)

Web Title: Daredevils in Uttar Pradesh arrested in Bandra