मुलुंडमध्ये डेंग्यूने एकाचा बळी

By Admin | Updated: August 22, 2014 00:44 IST2014-08-22T00:44:22+5:302014-08-22T00:44:22+5:30

मुलुंड येथील खासगी रुग्णालयात बुधवारी एका 32 वर्षाच्या रुग्णाचा डेंग्यूमुळे बळी गेला. या रुग्णाला डेंग्यूचा ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,

Dangue is one of the victims of Mulund | मुलुंडमध्ये डेंग्यूने एकाचा बळी

मुलुंडमध्ये डेंग्यूने एकाचा बळी

मुंबई : मुलुंड येथील खासगी रुग्णालयात बुधवारी एका 32 वर्षाच्या रुग्णाचा डेंग्यूमुळे बळी गेला. या रुग्णाला डेंग्यूचा ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर तापाची तीव्रता वाढल्याने त्या रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.
मुलुंड  येथील त्या खासगी रुग्णालयात त्याच वेळेस आणखी पाच डेंग्यू रुग्णांना दाखल केले होते. त्यातील एकाला आठवडय़ापेक्षाही अधिक काळ व्हेंटिलेटवर ठेवले होते. याविषयी पालिकेकडे कोणतीच माहिती नसून त्याबद्दल अहवाल मागविण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षप्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. यापूर्वी मालाड मालवणी येथे  डेंग्यू संशयिताचा मृत्यू झाला होता. 

 

Web Title: Dangue is one of the victims of Mulund