शस्त्रतस्करांना दणका

By Admin | Updated: November 30, 2014 00:56 IST2014-11-30T00:56:53+5:302014-11-30T00:56:53+5:30

मुंबईतल्या अंडरवल्र्डसह गुन्हेगारी आणि शस्त्रतस्करी मोडून काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईला जोरदार यश मिळाले आहे.

Dangers to the Weapons | शस्त्रतस्करांना दणका

शस्त्रतस्करांना दणका

जयेश शिरसाट ल्ल मुंबई
मुंबईतल्या अंडरवल्र्डसह गुन्हेगारी आणि शस्त्रतस्करी मोडून काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईला जोरदार यश मिळाले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेसह मुंबई पोलिसांनी शहरातून तब्बल 257 अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर, पिस्तूल) आणि तब्बल 715 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. या कारवाईच्या निमित्ताने मुंबईच्या वांद्रे ते दहिसर पसरलेल्या पश्चिम उपनगरांमध्ये शस्त्रतस्करी, खरेदी-विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसारखी राज्ये किंवा दिल्लीसारख्या शहरांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, लूटमारीत रिव्हॉल्वर, पिस्तूल किंवा रायफल अशा घातक शस्त्रंचा अधिकाधिक वापर होताना दिसून येतो. मुंबईतही 9क्च्या दशकात अंडरवल्र्ड ऐन भरात असताना एके 47, उझी अशा अद्ययावत मशिन गनसह स्टार, सिक्सर अशा रिव्हॉल्व्हर, पिस्तूल या शस्त्रंच्या साहाय्याने दरदिवशी गँगवॉर घडत होते. तूर्त ही परिस्थिती बदलली असली तरी मुंबईत परराज्यांमधून होणारी शस्त्रतस्करी कमी झालेली नाही. गावठी कट्टय़ांपासून ‘मॉडीफाइड’ पिस्तूलर्पयतची सर्व शस्त्रे मुंबईत येत आहेत. अंडरवल्र्डपेक्षा ही शस्त्रे दरोडेखोर, वाटमारे किंवा सूडबुद्धीने पेटलेल्यांच्या हाती पडत आहेत. या शस्त्रंच्या मदतीने गंभीर गुन्हे घडू शकतात, या शक्यतेने मुंबई पोलिसांनी शस्त्रतस्करांभोवती फास आवळण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. 
हीच मोहीम राबवताना गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग व मोटार वाहनचोरीविरोधी  पथकातील अधिका:यांनी निर्माते अली मोरानी यांच्या घरावर गोळीबार करणा:या तसेच दिग्दर्शक महेश भट यांच्या हत्येची तयारी करणा:या गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या 14 गुंडांना गजाआड केले. तसेच त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही हस्तगत केला. या पथकांना सुरुवातीला शस्त्रसाठय़ाची माहिती मिळाली होती. अटक आरोपींच्या चौकशीतून हे दोन गंभीर गुन्हे उघड झाले. मुंबईत या वर्षी अवैध शस्त्र बाळगणो, तस्करी करणो याविरोधात 212 गुन्हे नोंदवून 254 शस्त्रे, 715 काडतुसे हस्तगत केली. तसेच 297 आरोपींना गजाआड केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कारवाई जवळपास दुप्पट आहे. या वर्षी सर्वाधिक कारवाया पश्चिम उपनगरांत झाल्या. येथे शस्त्रंचे 7क् गुन्हे नोंद झाले. त्यात 84 जणांना अटक झाली तर 64 शस्त्रे हस्तगत केली गेली.
 

 

Web Title: Dangers to the Weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.