धोकादायक न्यू गर्ल्स स्कूल पाडण्यास सुरुवात

By Admin | Updated: June 9, 2014 01:55 IST2014-06-09T01:55:49+5:302014-06-09T01:55:49+5:30

ठाणे पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये पी.ई सोसायटीच्या न्यू गर्ल्स स्कूल शाळेच्या इमारतीचेदेखील नाव आल्याने आता शाळा प्रशासनाने ही इमारत पाडण्यास सुरु वात केली आहे.

Dangerous New Girls started throwing down the school | धोकादायक न्यू गर्ल्स स्कूल पाडण्यास सुरुवात

धोकादायक न्यू गर्ल्स स्कूल पाडण्यास सुरुवात

कोपरी : ठाणे पालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये पी.ई सोसायटीच्या न्यू गर्ल्स स्कूल शाळेच्या इमारतीचेदेखील नाव आल्याने आता शाळा प्रशासनाने ही इमारत पाडण्यास सुरु वात केली आहे.
ठाणे महानगरपालिकेने ३० वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारतींना धोकादायक घोषित केले आहे. यामध्ये पी.ई. सोसायटीची न्यू गर्ल्स स्कूल ही इमारतदेखील धोकादायक ठरविल्याने ही इमारत शाळा प्रशासनाने तोडण्यास सुरु वात केली आहे. तसेच त्या जागी पुन्हा नव्याने इमारत बांधण्यात येणार आहे. तोपर्यंत न्यू गर्ल्स स्कूलच्या नववीचा १, दहावीचा १, अकरावीचे ३, बारावीचे ३ असे सर्व वर्ग प्राथमिक शाळेच्या वर्गांमध्ये भरविण्यात येणार असून, प्राथमिकचे वर्ग शाळेच्या भोळे सभागृहात भरविण्यात येणार आहेत.
दरम्यान, न्यू गर्ल्सचे कामकाज व शिक्षकांना बसण्याची व्यवस्था न्यू इंग्लिश स्कूल येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती पीपल एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी आल्हाद जोशी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Dangerous New Girls started throwing down the school