मुंबईच्या मूळ वस्त्याच धोक्यात

By Admin | Updated: March 31, 2015 01:55 IST2015-03-31T01:55:54+5:302015-03-31T01:55:54+5:30

मूळ मुंबईकरांनाच झोपडपट्टीचा दर्जा विकास नियोजन आराखड्यातून देण्यात आल्यामुळे गावठाण, कोळीवाडे आणि आदिवासी पाड्यांतील रहिवाशांमध्ये

The danger of Mumbai's original habitation | मुंबईच्या मूळ वस्त्याच धोक्यात

मुंबईच्या मूळ वस्त्याच धोक्यात

मुंबई : मूळ मुंबईकरांनाच झोपडपट्टीचा दर्जा विकास नियोजन आराखड्यातून देण्यात आल्यामुळे गावठाण, कोळीवाडे आणि आदिवासी पाड्यांतील रहिवाशांमध्ये रोष पसरला आहे़ शहराचा विकास आराखडा हा या मूळ मुंबईकरांनाच हद्दपार करण्याचा डाव असल्याचा सूरही गावठाण-कोळीवाड्यातून उमटू लागला आहे़
मरोळ, टँक पाखडी, सुतार पाखडी, चर्च पाखडी गावठाण, गुंदवली, राठोडी, मालवणी, मार्वे, अक्सा, एरंगल, मढ, मनोरी, जुहू, वाकोला, कालिना, शर्ली राजन, वांद्रे, जुना खार, अंधेरी, केणवी, आंबोली, वर्सोवा, कांदिवली पोईसर, गोराई, कुळवे आणि चेंबूर येथील गावठाण व कोळीवाड्यांची गणना सन २०१४-२०३४च्या विकास आराखड्यात झोपडपट्टी / क्लस्टरमध्ये करण्यात आली आहे़
यावर आक्षेप घेत झोपडपट्टीचे लेबल गावठाण व कोळीवाड्यांवरून काढण्याची मागणी वॉचडॉग फाउंडेशन या संस्थेने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे़ आशिया खंडात जुन्या गावांचे संवर्धन केले जात असताना मुंबईत मात्र शहराचा इतिहासाच मिटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची नाराजी या संस्थेचे सदस्य गॉडफ्रे पिमेन्टा यांनी व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The danger of Mumbai's original habitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.