मुंबईतील पाणथळ जागा नष्ट झाल्यामुळे फ्लेमिंगोंना धोका; तज्ज्ञांनी केल्या शिफारशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:16 AM2020-10-11T00:16:09+5:302020-10-11T00:16:31+5:30

मुंबईच्या ओळखीचा भाग झालेल्या फ्लेमिंगोंवर अशाश्वत विकासाचा विपरीत परिणाम होत आहे

Danger to flamingos due to destruction of wetlands in Mumbai; With expert recommendations | मुंबईतील पाणथळ जागा नष्ट झाल्यामुळे फ्लेमिंगोंना धोका; तज्ज्ञांनी केल्या शिफारशी

मुंबईतील पाणथळ जागा नष्ट झाल्यामुळे फ्लेमिंगोंना धोका; तज्ज्ञांनी केल्या शिफारशी

Next

मुंबई : १९८०च्या दशकापासून सप्टेंबर ते एप्रिल या काळात ठाणे खाडीत ३० हजार ते ४ हजार फ्लेमिंगो वस्ती करत आले आहेत. चाळीस वर्षांपूर्वी फ्लेमिंगोंना शहरात राहण्यासाठी आदर्श परिस्थिती होती. पण आज फ्लेमिंगोंची वसतिस्थाने आक्रसलेली दिसत आहेत. अनेक भागांतील बांधकामांमुळे पाणथळ जागा सातत्याने नष्ट होत आहेत आणि फ्लेमिंगोंना छोट्या जागेत राहावे लागत आहे, अशी नाराजी तज्ज्ञांनी व्यक्त केली.

जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाच्या निमित्ताने द फ्लाइट आॅफ द पिंक-हाऊ कॅन मुंबई प्रोटेक्ट द लेसर फ्लेमिंगो या शीर्षकाखाली वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. हा वेबिनार बायोडायव्हर्सिटी बाय द बे या अभियानाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. जैवविविधता संरक्षणाचा मुद्दा सर्वांसमोर आणण्याच्या हेतूने मुंबईकरांनी मिळून सुरू केलेल्या मिनिस्ट्री आॅफ मुंबईज मॅजिक या नागरिकांच्या सामूहिक संस्थेने हे अभियान हाती घेतले आहे.

मुंबईच्या ओळखीचा भाग झालेल्या फ्लेमिंगोंवर अशाश्वत विकासाचा विपरीत परिणाम होत आहे. याची दखल घेण्यासाठी वन्यजीवविषयक चित्रपटकर्त्या अशीमा नरेन, मॅनग्रोव्ह सेलचे सीसीएफ आणि प्रमुख वीरेंद्र तिवारी, लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हॉर्न्मेंट ऋत्विक दत्ता, वनशक्ती संस्थेतील प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद हे यात सहभागी झाले होते.

स्टॅलिन दयानंद म्हणाले, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि जेएनपीटीच्या विस्तारासाठी २ हजार हेक्टरच्या पाणथळ जागा गमावल्यानंतर फ्लेंमिंगो आणि पाणथळ पक्ष्यांचा निवारा आधीच्या तुलनेत २० टक्केच राहिला आहे. ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँक्च्युुरी अशा १.५ लाख पक्ष्यांसाठी एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे, जसे की मॅनग्रोव्ज, गवताची जमीन, जलाशय; या सर्वांना जोडले गेले पाहिजे. सध्या ६० टक्क्यांहून अधिक निवास सँक्च्युरीच्या सीमेबाहेर ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून नंतर इतर प्रकल्पांना फायदा होईल.

Web Title: Danger to flamingos due to destruction of wetlands in Mumbai; With expert recommendations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.