हानिकारक रंगांवर बंदी
By Admin | Updated: March 3, 2015 22:44 IST2015-03-03T22:44:39+5:302015-03-03T22:44:39+5:30
शहर मानवी शरीराराला अपायकारक ठरतील असे कोणतेही रंग विकणे, खेळणे, रंगाने अथवा पाण्याने भरलेले फुगे फेकणे या बाबी गुनहा ठरविण्यात आल्या

हानिकारक रंगांवर बंदी
पंकज रोडेकर ल्ल ठाणे
शहर मानवी शरीराराला अपायकारक ठरतील असे कोणतेही रंग विकणे, खेळणे, रंगाने अथवा पाण्याने भरलेले फुगे फेकणे या बाबी गुनहा ठरविण्यात आल्या असून, हानिकारक रंगांची विक्री, साठा, ते खेळणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्व सोसायट्यांनी आपल्या गच्च्या कुलूपबंद ठेवाव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
एकीकडे पर्यावरण, संवर्धन आणि एक गाव एक होळीचे नारे दिले जात असले तरी प्रत्यक्षात होळ्यांच्या संख्येत गतवर्षी पेक्षा २५ ने वाढ झाली आहे.
आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात यंदा पावणे तीन हजार होळ्या गुरूवारी साजऱ्या होणार आहेत. याशिवाय गल्लीबोळात, चौकात होळ्या पेटविल्या जाणार आहेत. त्यांचा समावेश यात नाही. सार्वजनिक होळ्यांत ५ ने जरी घट झाली असली तरी खाजगी होळ्यांची संख्या ३० ने वाढली आहे. होळी आणि धुळवडीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. मानवी शरीरास इजा होणारे रंग विकणाऱ्या आणि खेळणाऱ्यांवर बंदी असून त्याची विक्री व वापर झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सर्वाधिक ११९ सार्वजनिक होळी वागळे इस्टेट परिसरात तर ६६० खाजगी होळ्या कल्याण महानगरात पेटविल्या जाणार आहेत. याचदरम्यान, फुगे आणि प्लॉस्टिक पिशव्या इमारतीच्या गच्चीवरुन मारल्या जात असल्याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन गच्ची बंद कराव्यात. तसेच सध्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरु असल्याने स्पीकरचा आवाज कमी ठेवावा.असे आवाहन ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी केले आहे.
(प्रतिनिधी)