Join us

स्पाईसजेट विमानाची शिडी इंडिगो विमानावर पडल्याने नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:44 IST

मुंबई विमानतळावरील घटना 

 

मुंबई : सोसाट्याच्या वेगवान वाऱ्यामुळे मुंबईविमानतळावर एका विमानाची शिडी उडून बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या विमानाला जाऊन धडकल्याने विमानाचे नुकसान झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंद असल्याने व देशांतर्गत हवाई प्रवास मर्यादित प्रमाणात सुरु असल्याने मुंबई विमानतळावर अनेक विमाने पार्क करुन ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी स्पाईसजेटच्या विमानाची शिडी वाऱ्याने उडून बाजूला असलेल्या इंडिगो विमानावर जावून पडली त्यामुळे इंडिगोच्या विमानाच्या इंजिन असलेल्या पंख्याचे नुकसान झाले. याबाबत अधिक तपास केला जात आहे. 

स्पाईसजेटचे विमान सी 87  या ठिकाणी लावण्यात आली होते तर त्याच्या शेजारी सी 86 या ठिकाणी इंडिगोचे व्हीटी एसएलए हे विमान पार्क करण्यात आले होते. शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यांमुळे स्पाईसजेटची विमानातून उतरण्यासाठी वापरली जाणारी शिडी मागच्या बाजूला ढकलली गेली व इंडिगो विमानाच्या उजव्या पंख्याला जावून धडकली. सध्या या घटनेची चौकशी केली जात आहे अशी माहिती विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आली. 

 

टॅग्स :विमानतळमुंबई