Join us

राज्यात दैनंदिन मृत्यूचा उच्चांक, दिवसभरात ९२० मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 02:11 IST

दिवसभरात ९२० मृत्यू, तर ५७,६४० नवे रुग्ण

ठळक मुद्देराज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ असून, मृतांचा आकडा ७२,६६२ इतका आहे. राज्यात बुधवारी ५७ हजार ६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ४१ लाख ६४ हजार ९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय, मात्र मृत्यूचे प्रमाण ‘जैसे थे’ असल्याने चिंता कायम आहे. राज्यात दिवसभरात पुन्हा दैनंदिन मृत्यूची उच्चांकी नोंद झाली आहे. राज्यात दिवसभरात ५७,६४० रुग्ण मिळून आले, तर ९२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६ लाख ४१ हजार ५९६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ असून, मृतांचा आकडा ७२,६६२ इतका आहे. राज्यात बुधवारी ५७ हजार ६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ४१ लाख ६४ हजार ९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३२ टक्के आहे. राज्यातील मृत्युदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८३ लाख ८४ हजार ५८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.१९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या