दहीहंडीचा गोंगाट!
By Admin | Updated: September 8, 2015 01:49 IST2015-09-08T01:49:04+5:302015-09-08T01:49:04+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी पार पडलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान आयोजकांनी ध्वनिप्रदूषण केल्याची तक्रार ‘आवाज फाउंडेशन’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे

दहीहंडीचा गोंगाट!
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी पार पडलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान आयोजकांनी ध्वनिप्रदूषण केल्याची तक्रार ‘आवाज फाउंडेशन’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान आवाजाने तब्बल १०५ डेसिबलपर्यंतची
पातळी गाठल्याचे फाउंडेशनचे म्हणणे असून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे
पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
आवाज फाउंडेशनने मुंबईतील दहीहंडी उत्सवादरम्यान आवाजाचे प्रमाण मोजले आहे. वांद्रे, शिवाजी पार्क, जांबोरी मैदानाजवळ, वरळी नाका, दादर, युनियन पार्क रोड, खार-दांडा रोड, आंबेडकर रोड, भायखळा, मीरा रोड आणि मरिन ड्राइव्ह या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. वरळी व खार येथील हंडीच्या उत्सवातील आवाजाची पातळी १०० डेसिबलपर्यंत नोंदविण्यात आल्याचे फाउंडेशनचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक हंड्यांचे आयोजन राजकीय पक्षांनी केल्याचे फाउंडेशनने म्हटले असून, गतवर्षीपेक्षा या वर्षी आवाजाची पातळी घटल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
आवाजाची पातळी
हंडीचे स्थळआवाज
शिवाजी पार्क८८
जांबोरी मैदान८१.८
वरळी नाका१००
दादर९५
हिल रोड, वांद्रे९१
युनियन पार्क, खार१०५
खारदांडा रोड९५
आंबेडकर रोड९२
भायखळा८२
आग्रीपाडा७६
वांद्रे७१
मरिन ड्राइव्ह९०